मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केलंत? मग ‘हे’ होईल! बघा फोटोवर क्लीक करून

मासिक पाळी कधीच मजेदार नसते. तुम्हाला जर गरोदर राहायचं नसेल तर मात्र मासिक पाळीत काहीतरी मजेचा भाग असू शकतो. कुठल्याही स्त्रीला विचारा आणि ती तुम्हाला सांगेल की तिला त्या अघोरी वेदना किती नकोशा वाटतात. असं असलं तरी, मासिक पाळीच्या दरम्यानची अशी एक गोष्ट आहे जी सगळ्या स्त्रियांना आवडते पण त्याबद्दल त्या बोलत, सांगत नाहीत. आणि ती गोष्ट आहे, सेक्स! कितीही घाणेरडं आणि गलिच्छ वाटलं तरी मासिक पाळीच्या दरम्यान केलेलं सेक्स म्हणजे मजाच!

 

मासिक पाळीच्या दरम्यान केलेलं सेक्स हे पूर्णपणे सुरक्षित व चांगलं असतं या गोष्टीला डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. म्हणून मासिक पाळी चालू असताना तुम्ही सेक्स का केलं पाहिजे याची ही १० कारणं वाचा खालीलप्रमाणे.

१. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने एरव्ही पाळीच्या दरम्यान तुम्ही जे असह्य असे पेटके अनुभवता ते कमी होतात. ऑरगॅझमच्या (रति-निष्पत्ति) दरम्यान तयार होणाऱ्या ऑक्सिटोसिनमुळे तुमचा मूड चांगला होतो, शारीरिक पातळीवरही तुम्हाला खूप छान वाटतं. आणि एरव्ही पाळीच्या दरम्यान तुम्हाला जे तुमच्या गर्भाशयावर मोठ्ठा वजनदार दगड ठेवल्यासारखं वाटतं, त्या भावनेतून तुमची सुटका होते.

२. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने मासिक पाळी आणि त्यादरम्यान होणारा रक्तस्राव याकडे जे एक लांछन म्हणून पाहिलं जातं, तो दृष्टिकोन तुम्ही तुमच्या साथीदाराच्या मदतीने बदलू शकता.

३. मासिक पाळीचा काळ हा असा असतो जेव्हा तुम्हाला एरव्हीपेक्षा जास्त मादक वाटू लागतं आणि सेक्स करण्याच्या तुमच्या इच्छेत वाढ होते. म्हणून या काळात जर तुम्ही सेक्स केलंत तर ते तुम्हाला पुरेपूर सुख देईल यात शंका नाही.

४. सेक्स करताना तुमच्या साथीदाराचं थोडं वीर्य तुमच्या योनीत गेल्यास काळजी करायचं काही कारण नाही, कारण मासिक पाळी चालू असताना सेक्स केल्यास तुम्ही गरोदर राहण्याची शक्यता खूपच कमी असते.

५. मासिक पाळीच्या दरम्यानचं सेक्स तितकंही भोंगळ नसतं. स्त्रीची मासिक पाळी चालू असते तेव्हा तिच्या शरीरातून सरासरी, जवळजवळ ३०-४० मिलिलिटर एवढा रक्तस्राव होतो. आणि म्हणून दर महिन्याला ३-५ दिवस रक्तस्राव होतो.

६. अतिरिक्त, वरून लावायच्या लूब्रिकेशनची गरजच नाही. मासिक पाळीच्या दरम्यान तुमचा योनीमार्ग ओलसर ठेवण्यासाठी शरीराद्वारे पुरेशा द्रवाची निर्मिती केली जाते. तेव्हा, फारसा खटाटोप न करता तुम्ही सेक्सचा आनंद लुटू शकता.

७. संशोधनाअंती असं दिसून आलं आहे की, मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे बेफाम, बेधुंद पैलू उघड होतात. आणि त्याचा अर्थ हा की, तुम्ही अधिक उत्कटतेने आणि जास्त वेळ सेक्सचा आनंद लुटाल! त्याशिवाय, अशामुळे तुमच्या साथीदाराचा स्वाभिमान देखील तुम्ही वाढवाल.

८. मासिक पाळीच्या दरम्यानचं सेक्स सगळ्यांनाच आवडतं! त्याबद्दल कुणी बोलत नाही खरं, पण कुठल्याही स्त्रीला विचाराल तर ती हे न लाजता कबूल करेल की तिला मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स खूप आवडतं. रक्तस्राव होत असल्याने थोडं घाण वाटू शकतं, पण तुम्ही सेक्स झाल्यावर स्वच्छता करू शकता.

९. या काळात तुमची विशिष्ट अन्नपदार्थांची तलफ वाढते. म्हणून, चॉकलेटचा बार गट्ट करण्याऐवजी, थोडं लिक्विड चॉकलेट तुमच्या साथीदाराच्या शरीरावर ओता आणि भन्नाट, बेधुंद व्हा.

१०. शेवटचं म्हणजे, मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने तुमचा तुमच्या साथीदारासोबत एक अनोखा बंध निर्माण होईल. कारण त्याला तुमच्या शरीराची चांगली जाण येईल आणि या काळात तुमच्या मूडमध्ये होणारे चढउतार त्याला समजून घेता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta