म्हणून बोनी कपूर ने आपल्या पहिल्या पत्नी ला घटस्फोट देऊन वयाने लहान असेल श्रीदेवीसोबत केला होता विवाह : पहा त्यामागे लपलेलं आहे हे रहस्य ..!

बॉलिवूड मध्ये अभिनेत्री म्हणून श्रीदेवी जितकी आपल्या अभिनयाने प्रसिद्ध होऊन लोकांचे चर्चेत होती त्याहीपेक्षा ती तिच्या प्रायव्हेट लाईफमुळे  Media मध्ये देखील नेहमीच चर्चेत राहिली होती. श्रीदेवी आणि बोनी कपूर ह्यांचे लग्न वादास्पद राहिलेले आहे. तुम्हाला माहीत नसेल पण हें खरे आहे की श्रीदेवी साठी बोनी कपूर ह्यांनी त्यांचे पहिल्या बायकोला घटस्फोट दिला होता. तिथे श्रीदेवी सुद्धा लग्नाअगोदरच प्रेग्नन्ट होती.

चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापर्यंत आपले अधिराज्य गाजवणारी एव्हरग्रीन म्हणून समजली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी आता ह्या दुनियेत राहिलेली. रुपेरी पडद्यावर श्रीदेवी ह्यांनी आपल्या अभिनयाने करोडो लोकांच्या मनावर राज्य केले होते. एक वेळ अशी सुद्धा आली होती जेव्हा तिची प्रायव्हेट लाईफ मध्ये खूप मोठी खळबळ उडालेली होती. श्रीदेवी आणि बोनी कपूर ह्यांचा विवाह देखील त्या काळात एक वादाचा मुद्दा ठरलेले होते. श्रीदेवी साठी बोनी कपूर ह्यांनी आपल्या पहिल्या बायकोलाच चक्क दिला होता घटस्फोट. तिथंच श्रीदेवी सुद्दा लग्नाच्या अगोदरच प्रेग्नन्ट झाली होती. इम्प्रेस करण्यासाठी दिले होते ११ लाख रुपये .

बोनी कपूर आणि श्रीदेवी ह्यांची लव्हस्टोरी सन- 1980 च्या दशकात सुरु झाली. एका मीडिया इव्हेण्ट मध्ये बोनी कपूर यांनीही म्हटले होते कि, मी श्रीदेवीला 70 च्या दशकात तामिळी चित्रपटातुन पहिल्यांदा पहिले होते. मी तीला भेटायला चेन्नईत गेलो कि चित्रपटासाठी करारबद्ध करून घेतो. त्यावेळी ती चेन्नईत नव्हती. मी तिला ‘सोलवां सावन’ चित्रपटात पाहिले. ती माझ्या मनावर घर करून गेली. त्या वेळी तिची आई तिचे चित्रपट निवडत होती. मी श्रीदेवी हिस ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात निवडण्यासाठी त्यांच्या आईकडे भेटायला गेलो होतो. त्यांच्या आईने माझेकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. त्याकाळी कलाकारासाठी १० लाख रुपये खूप मोठी रक्कम होती. तेव्हा मी सांगितले कि ११ लाख रुपये देईल. शेवटी मी तिला ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटासाठी साइन केले.

आईच्या मृत्यूमुळे आले होते दोघेही खूप जवळ :

श्रीदेवीच्या आईच्या आजारात आणि आजारपणानंतर व त्यांच्या मृत्यूच्या दरम्यान दोघांमध्ये जवळीकता वाढली. चित्रपट पत्रकार जयप्रकाश चौकसे ह्यांनी बीबीसी शी चर्चा मध्ये सांगितले कि श्रीदेवी ह्यांची आई आजारी होती. त्यांना ब्रेन सर्जरी करायची होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रीदेवी ह्यांच्या आईला सर्जरी साठी अमेरिकेत रवाना केले गेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी श्रीदेवी ह्यांच्या आईची चुकीची सर्जरी केले होती. श्रीदेवी ह्यांनी हॉस्पिटल वर गुन्हा दाखल केले नंतर हॉस्पिटल सोबत सेटलमेंट झाले आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून 16 करोड रुपये मिळाले होते. ह्यादरम्यान त्यांच्या आई आणि श्रीदेवी ह्यांची सेवा बोनी कपूर करत होते. आईच्या मृत्यूनंतर श्रीदेवीचे सांत्वन करण्यासाठी प्रत्येक वेळी बोनी कपूर तिचे सोबत राहत होते. श्रीदेवी ह्यांना बोनी कपूर ह्यांचा काळजी घेण्याचा हाच स्वभाव खूप भावला.  अश्याप्रकारे दोघेही जवळ आले.

बोनी कपूर ह्यांच्यासाठी श्रीदेवीने तोडले होते वचन :

बोनी कपूर ह्यांनी आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन श्रीदेवी सोबत लग्न केले होते. लग्नाअगोदर श्रीदेवी प्रेग्नन्ट होती. तिथे बोनी कपूर ह्यांच्याशी लग्न करण्यासाठी श्रीदेवी ह्यांनी एक शप्पथ तोडली होती. सन-1984 मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये जितेंद्र सोबत लग्नाबद्दल जेव्हा विचारलं गेलं होते तेव्हा श्रीदेवी ने सांगितले होते कि “मी कधीच कोणत्या विवाहित पुरुषासोबत लग्न नाही करणार. आमच्या साऊथ मध्ये दुसरी पत्नी बनण्यासारखी कोणती पद्धत नाही आहे.
परंतु बोनी कपूर सारखे काळजी घेणारा सहजोडीदार मिळणार असल्याने श्रीदेवीने दिलेले वचन मोडून अखेर बोनी कपूर सोबत केला विवाह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta