गोरगरिबांनचे कैवारी श्री हितेश दादा बनसोडे यांच्या कार्याला सलाम बघा त्यांचं अजपर्यँची गोरगरिबांसाठीची तळमळ

  1. एखादा नवीन शर्ट घेतला कि काढ फोटो नी टाक सोशल मिडिया वर.मौज म्हणून पर्यटनाला गेलात घे सेल्फी णी टाक सोशल मिडिया वर.इतकच कशाला गुड नाईट …गुड मोर्निंग चा तीटकरा वाटावा इतका सोशल मिडिया वर अतिरेक होत असतांना नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर च्या हितेश दादा बनसोड या तिशीतल्या युवकाने सोशल मिडिया च्या माध्यमातून अनाथांच्या मदतीची मोठी मालिकाच केली.ती कशी..जाणून घेऊयात…


….
नागपूर जिल्ह्यातलं सावनेर हे तालुक्याचं ठिकाण.सावनेर मध्ये आढळणाऱ्या मनोरुग्णाच्या पुनर्वसनासाठी आणि उपाशीपोटी झोपणाऱ्यांसाठी सावनेरचाच हितेश दादा बनसोड हा तिशीतला तरुण तन ,मन आणि धनाने मदत करतो.एरव्ही कुठेही दाढी आणि डोक्यावरचे वाढलेले केस,फाटके कपडे ,तोंडातून पडणारी लाळ असे मनोरुग्ण पहिले कि आपण तोंड फिरवतो .किवा फार फारतर हळहळ व्यक्त करतो.

पण सावनेर चा हितेश मात्र अशा मनोरुग्णाचा शोध घेतो ,त्यांना स्वच्छ अंघोळ घालतो,स्वतःच दाढी आणि कटिंग करून देतो आणि उपचारासाठी नागपूरच्या मनोरुग्ण इस्पितळात दाखल करतो.आतापर्यंत २० एक मनोरुग्णांना हितेश ने पुनर्वसनासाठी पाठवलं आहे .हितेश च्या या कामात स्थानिक पोलीस देखील मदत करतात.साधारणतः ३/४ वर्षांपूर्वी हितेश ने सोशल मिडिया वर उत्तर प्रदेशातल्या या भरतपूर स्थित “आपणा आश्रम”ने मनोरुग्णांच्या पूनर्वसन संदर्भात केलेल्या कार्याचा एक व्हिडीओ पहिला णी येथूनच त्याला काम करण्याची प्रेरणा मिळाली.

हितेश सी संपर्क साधला तेव्हा हितेश म्हणाला कि कामातलं समाधानच हे माझ्यासाठी म्हत्वाच आहे आपण केलेलं काम लोकांना दाखवायचा माझा अजिबात उद्देश नव्हता.स्थानिक नगराध्यक्ष ऍड,अरविंद लोधी यांनी हितेश चं काम इतरांना माहिती व्हावं म्हणून काही फोटो सोशल मिडिया वर टाकण्याचा सल्ला दिला.हितेश चं अस्सल सामाजिक कार्य जगापुढे यायला लागलं.याच सोशल माध्यमातून पुण्याचे व्यावसायिक श्री.बापूसाहेब दगडे पाटील यांनी मनोरुग्णांना ने आन करण्यासाठी अम्बुलंस दिली आहे.आणि वरून ड्रायव्हर चा पगार आणि गाडीचे डीझेल देखील.

हितेश सांगतो “मनोरुग्णांना टू व्हीलर वर बसुन घेऊन यायचं म्हणजे मोठी जोखीम,हे मनोरुग्ण चालत्या गाडीवरून कधी हलतील,उडी टाकण्याचा प्रयत्न करतील सांगता येत नाही.बऱ्याचदा यातुन अपघातही व्हायचे पण बापूसाहेब पाटील यांच्या मदतीमुळे हितेश चं एक काम सोप्पं झालं.हितेश नं आता अजून एक काम हाती घेतलं आहे,सावनेर मध्ये कुणी उपाशी पोटी झोपायला नको म्हणून “रोटी बँक “सुरु केली.

रात्री सगळ्यांची जेवणं झाली कि उरलेलं अन्न हितेश आणि त्याचे सहकारी जमा करतात आणि गरजूंपर्यंत पोहचवतात.या साठी हितेशनं सावनेर च्या घरो घरी जाऊन लोकांशी संपर्क केला.लोकांना आपला फोन नं.दिला.ज्या दिवशी कुठूनच फोन येत नाही त्या दिवशी हितेश स्वतः ३ किलो तांदळाचा मसालेभात बनून गरजूंपर्यंत पोहचवतो…त्यांना दोन घास खाऊ घालतो…हितेश ला आता हि चळवळ जिल्हा भरात पोहचवायची आहे.आणि त्यासाठीच तो सध्या प्रयत्न करतोय..टीन येजर्स आणि युवकांचा बराचसा वेळ हा एखाद्या टपरीवर वायफळ टाईमपास करण्यात जातो,या सगळ्या मुलांना हितेश ने समजून सांगितलं आणि मदतीचे धडे दिले परिणामी हितेश ची १८ मुलांची टिम तयार झाली आहे.३० वर्षीय हितेश बनसोडचं शिक्षण बी.कॉम पर्यंत झालं.

तो अटोमोबाईल रिपेरिंग आणि वॉशिंग चं काम करतो.या कामातून त्याला महिन्याकाठी १५ ते २० हजार रुपये मिळतात.घरी आई,बाबा,पत्नी ज्योति ,४ वर्षाची मुलगी रुद्राक्षी आणि भाऊ विकी असा मोठा परिवार आहे.२१ वर्षीय भाऊ विक्की ची कहाणी देखील अशीच.निराधार विक्की (रा.पारशिवनी ता.रामटेक) ला १० वर्षापूर्वी हितेश ने दत्तक घेतलं तेव्हा विक्की केवळ १० वर्षांचा होता.विक्की ला गाडी रेपेरिंग ची छोटी मोठी कामे शिकवली.विक्की च्या नावावर १ प्लॉट आणि व्यवसायासाठी उपयोगी साहित्य घेऊन दिलं.

हितेश म्हणतो “आमच्यात तसा कुठलाच वाद नाही पण भविष्यात झालाच तर त्यालाही स्वताचे भक्कम पर्याय असावे म्हणून आम्ही हि गुंतवणूक त्याच्या नावावर केली.हितेश च्या या सगळ्या कामात घरच्या मंडळींचा पाठींबा आणि हातभार असतो.
मुलांना जन्म देऊन प्रत्त्येकालाच “आई”होता एन नाही पण हितेश सारखं शेकडो लीकांची “माऊली” नक्कीच होता येतं.हितेश दादा बनसोड म्हणून तुम्ही फेसबुक ला फोल्लोव करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta