26 वर्षाची झाली अज्याची ‘शितली’ ! एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन !

26 वर्षाची झाली अज्याची ‘शितली’, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन, पाहा रिअल लाईफ फोटोज्. छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ‘लागिर झालं जी’ या मालिकेत शीतलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी बोरकर आज तिचा 26वा वाढदिवस साजरा करत आहे. या मालिकेतून शिवानी घराघरांत पोहोचली आहे. सैन्यात जायचं लागिरं झालेल्या अजिंक्यच्या अगदी उलट स्वभावाच्या शीतलची भूमिका शिवानीने या मालिकेत साकारली आहे.
शीतलच्या आयुष्यात कुठलंही ध्येय नाही. पवार कुटुंबातली ही लाडकी मुलगी आला दिवस निवांत आणि हसत खेळत जगणारी अशी आहे. पवारांच्या घरात गेल्या अनेक पिढ्यांत मुलीचा जन्म झाला नाहीये. त्यामुळे शीतल ही सर्वांची लाडकी आहे.

शीतलचे दोन्ही काका आणि काकी यांचाही तिच्यावर फार जीव आहे. सर्व भावंडात एकुलती एक मुलगी असल्याने तिचे घरात खूप लाड होतात.

डेअरिंगबाज मुलीच्या भूमिकेत शिवानी शोभून दिसते. या मालिकेत फौजी बनलेला अजिंक्य आणि त्याच्या प्रेमात असलेली शितली यांची हळूवार फुलणारी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात प्रेक्षकांच्या लाडक्या शीतली अर्थातच अभिनेत्री शिवानी बोरकर हिच्याविषयी..

मुळची पुण्याची आहे शिवानी…

शिवानीचा जन्म 11 मार्च 1992 रोजी पुण्यात झाला असून लवकरच ती वयाची 25 वर्षे पूर्ण करणार आहे. बालपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या शिवानीने अभिनयासाठी पुणे सोडून मुंबई गाठले.

‘लागिरं झालं जी’पूर्वी झळकली आहे अनेक मालिकांमध्ये..
शिवानीला खरी ओळख लागिरं झालं जी या मालिकेने मिळवून दिली आहे. पण ही तिची पहिली मालिका नाहीये. यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. हिंदीत अगले जनम मोहे बिटियाही किजो, फुलवा या मालिकांमध्ये शिवानीने काम केले. तर मराठीत ती देवयानी, सुंदर माझं घर या मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. या मालिकांमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले, पण तिला खरी ओळख मिळू शकली नव्हती. लागिरं झालं जीमधून ती घराघरांत पोहोचली.

मोठ्या पडद्यावर झाले आहे पदार्पण…शिवानीने छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. दगडाबाईची चाळ या चित्रपटातून तिचे मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण झाले. पहिल्याच सिनेमातील भूमिकेसाठी तिला अवॉर्ड मिळाले आहेत.

‘लागिरं झालं जी’साठी घेते एवढे मानधन…इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ‘लागिरं झालं जी’ या मालिकेसाठी शिवानी प्रतिदिन 20 ते 25 हजार रुपये मानधन घेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta