स्त्री आणि मानसिक बलत्कार :- एक हृद्दयभेदी सत्य परिस्थितीवर आधारित अप्रतिम लेख : ऑनलाईन असणाऱ्यांनी जरूर वाचा

थोडं लक्ष देऊन वाचा आणि पोस्ट च्या सुरुवातीलाच माफ करा ज्यांना ही पोस्ट वाचून भावना दुखावल्या जातील…!!
रोजच्या दैनंदिन जीवनात अनेक काम वगैरे करताना “#अरे_तुझ्या_आईला…” हा शब्द प्रत्येकाच्या तोंडुन एकायला मिळतो..
एवढच नाही तर मदरचोद, भेंचोद, आईघाल्या, व अश्या कित्येक प्रकारच्या स्त्री ला नागड करणार्या शिव्या आपन रोज एकतो.. पण याच जागेवर आपण फादरचोद, भाईचोद, बापघाल्या अश्या शिव्या का नाही वापरत हा प्रश्न मला नेहमीच पडतो.. विचार तर करा आईने एवढ्या वेदना सहन करून तुम्हाला जिथुन जन्म दिलाय त्याच अव्ययावर शिव्या देने तुम्हाला शोभतय का ? हा आता काही लोकांना असेही वाटून गेलं असेल की आम्ही शिव्या देतोय तर तुझं जातंय काय…? पण असा विचार करणाऱ्या सर्व सज्जन माणसांना मी एकमेव प्रश्न विचारू शकतो… नस तुमच्या आईने तुम्हाला अनेक वेदना सहन करून वाढवलंय तसच त्यांच्या ही आईने वाढवलंय ना…?? मग शोभत का असा उद्दामपणा की त्याच आईच्या अवयवांवर आपण अपशब्द वापरून शिव्या द्यायव्यात…????

दुसरा मुद्दा असा की घरात कुणी लहान मुलगा रडत असला कि ” काय मुलीं सारख रडतो ” हे आपल्या प्रत्येकाच्याच घरात एकायला मिळत.. तर हे असं फक्त मुलीच कमजोर असतात त्याच फक्त मुलुमुलू रडतात का ??
का हो ? का नाही रडाव पुरूषांनी ?
पुरूष म्हणजे अगदी शुर वीर पराक्रमी आणि स्त्री म्हणजे काही तरी तुच्छ का ?
मी तर म्हणतो रडाव पुरूषांनी तेही अगदी वाटेल तेवढ आणि वाटेल तस.. त्यांनाही रडुन मन मोकळ करायचा अधिकार आहे.. आता यातूनही गैरसमज करून घेणारे खूप आहेत ज्यांना वाटत की पुरुष एवढा ताकदवान असतो की तो आहे म्हणून स्त्री आहे… पण आता ची परिस्थिती पाहून तुमच्या लक्षात आलेच असेप की स्त्री कुठेच मागे नाहीय…!

खरंतर मला स्वतःला या गोष्टीची खूप म्हणजे खूप किळस येते ती गोष्ट म्हणजे आपल्यात नपुंसक लोकांची फार खिल्ली उडवल्या जाते.. कधी कधी तर एखाद्या मुलाने काही केल्यास “काय छक्क्या/हिजड्या सारख करतोय” अस देखील एकायला मिळत.. पण नपुंसक म्हणजे अर्धा पुरूष आणि अर्धी स्त्री पण तरीही त्याला स्त्री वरूणच शिव्या द्यायच्या.. म्हणजे आलच परत स्त्री वर.. खरं तर ते ही आपल्या सारखी माणसं आहेत.. लागल्यावर त्यांना ही दुखतं.. त्यांच ही रक्त लालच.. मागासवर्गीयांचा ही कधी असाच विटाळ होत होता.. म्हणुन या मधे त्यांची काही चुक नसुन त्यांच्या तिल क्रोमोझोम्स ची आहे.. आणि अशा लोकांना खरं तर आधाराची सहानुभूती ची गरज असताना तुम्ही त्यांनाही स्त्री वरूनच का बरं बोलताय .???

पृथ्वी म्हणजे ‘ती’ आपल्याला या जगात आणणारी म्हणजे ‘ती’ म्हणजेच स्त्री ही सृष्टी ची निर्माता तरी प्रत्येक गोष्टीत तिलाच दोष दिला जातो….!
तिने कशे कपडे घालावे, पंजाबी ड्रेस घालावा कि जिन्स कि शॉर्टस् हे सुद्धा तिला स्वतः च्या मनाने घालन्याचा अधीकार नाही.. आणि तिच कैरेक्टर हे तिच्या कपड्यांवरूण ठरवल जातं.. आणि हे ठरवणारे तिच आई-बहिनीवर शिव्या देणारी मुलं.. का असा वागतात लोक…? हो तिला सुंदर दिसण्याचा वर दिलाय देवाने पण तेच आभूषण तिचीच सुंदरता वाढवता ना…?

मुलाने मात्र उघडं सगळं गाव भर फिराव पण मुलिच्या ड्रेस मधुन थोडा स्लिप चा बेल्ट बाहेर काय आला तिला “#बघ_ईशारे_देतिये” म्हणुन संबोधित करण.. किती निर्लज्जपणे बोललं जातं हे सर्व …!

त्याने मात्र गावभर पोरी फिरवायच्या पण तिचे काही मित्र असले तर तिला वैश्या म्हणायच.. ते ही मनमोकळे मित्र असले तरी तिच्या चारित्र्यावर सरळ संशय च घ्यायचा…!

त्याने रात्र भर बाहेर फिरायच पण तिला मात्र बाहेरूण घरी यायला रात्र झालीस तर तिला रेट विचारायची.. का असा..?

ति पातळ असली तरी टोमणे,
जाड असली तरी टोमणे,
ति काळी असली तरी तेच,
ति गोरी असली तरी तेच,
ति सलवार वर असली तरी छेडतात,
जिन्स वर असली तरी छेडतात,
ति शांत असली तरी बदनामी,
ति मस्तीखोर असली तरी बदनामी..
आणि
ति कुणाला बोलत नसली तर “#एवढा_कशाचा_एटिट्युड_आहे_कुत्री” असे म्हणुन बोलने आणि जर
ती सर्वांना बोलत असली तर
“#सर्वांना_लाईन_देते_साली_छिन्नाल” असे त्यांचे बोलने..

वरती एवढं सर्व वाचून खरंतर काही लोकांना खूप वेगळं वाटलं असेल पण ही खरच वस्तुस्थिती आहे… अलीकडे एखादी स्त्री सोशल मीडियावर रात्री ऑनलाइन असेल तरी फार काही बोलत जात…आणि यालाच कदाचित मानसिक बलात्कार अस म्हणतात…

आणि असला हा मानसिक बलात्कार स्त्री ला रोज सहन करावा लागतो..
पण या मधे चुक त्या मुलांची नाही त्यांच्या सडक्या मेंदुची आहे.. आहो एकदा निरिक्षण तर करा जे अव्यय आम्हाला आहेत तसेच सेम तुमच्या आई-बहिनींना आहेत..
काय फरकपडतो आई-बहिन आपली असो कि दुसर्यांची तिची ईज्जत करा..! कारण प्रत्येकाला या जगात त्याच माउलीने जन्म दिला असतो ती आई असते… प्रत्येकाच्या आई बहिणीची इज्जत करायला शिका….!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta