होय मी शहीद-शुभम मुस्तापुरे बोलतोय.. सर्वांनी वेळ काढून वाचा आपल्या देशाच्या धाडसी जवानासाठी शहीद-शुभम मुस्तापुरे यांच्यासाठी

सर्वांनी वेळ काढून वाचा आपल्या देशाच्या *धाडसी जवानासाठी.* शहीद-शुभम मुस्तापुरे यांच्यासाठी

*होय मी शहीद-शुभम मुस्तापुरे बोलतोय……*

©लेखक/कवी- अभिषेक मोहोळ

*मी शुभम बोलतोय*….होय तुमचा शहिद शुभम मुस्तापुरे. काही क्षण आधीच घरातल्यांना म्हणलो होतो *”जगलो तर तुमचा नाही तर भारत मातेचा”* कारण आता खूप पुढे आलोय लढण्यासाठी आणि झालो पण भारत मातेचा.खरे सांगू दोन दिवस “शहीद शुभम मुस्तापुरे अमर रहे”, “वीर जवान तुजे सलाम” असे ऐकून नक्कीच छाती अभिमानाने फुगली आहे कारण एवढ्या कमी वयात मी या मातीतली *सर्वात मोठी पदवी ‘शहीद’* नावाची घेऊन चाललोय ती पण माझ्या भारत मातेने दिलेली…

 

खरं तर आज मला माझ्या आई-बाबांची माफी मागायची आहे.तुमची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेण्याऐवजी सोडून गेलोय मी तुम्हाला. *आई माफ करशील ना ग..* कारण तू नेहमी सांगत असे बाळा पाठी-पाठीमागे राहत जा पुढे जात नको जाऊ. तुझी ममता कळवळून बोलायची,पण आई त्यादिवशी *पाकिस्तानकडून सकाळी हल्ला झाल्यावर माझ्यापुढे फक्त आणि फक्त भारत माता उभी होती ग…* तिच्या काळजीपोटी सारे काही विसरून गेलो.पुढे सरसावलो,धावलो,लढलो खूप वेळ प्रतिकार केला आणि अचानक…………डोळ्यापुढे अंधारी आली आणि तुम्ही सर्व एका क्षणात डोळ्यासमोर आलात आणि शेवटचा श्वास घेतला गेला…

पण आई तुझ्या शुभम चा सैन्यदलात सर्वजण *धाडसी सैनिक* म्हणून कौतुक करायचे आणि धाडसी सैनिक म्हणूनच मी शहीद झालो.खूप खूप अभिमान बाळग तुझ्या मुलावर कारण माझ्या बलिदानामुळे *चौकाचौकात , कट्ट्यावर बसणारी व डॉ, वकील,इंजिनीअर,businessman* म्हणून स्वप्न पाहणारी मुले ही विचार करू लागलेत आपण काय करतोय आणि शुभम काय करून गेलाय…

घराघरातल्या प्रत्येक आई-बाबांच्या काळजाचा ठोका चुकलाय कारण 20 वर्षाचा मुलाला ते देशासाठी बलिदान दिलेलं पाहतायेत आणि विचार करत आहेत की आपली मुले नक्की काय करत आहे… *तुझ्या शुभम मुळे विचारांचे परिवर्तन झालय.* आता बघ यातूनच अनेक शुभम जन्माला येतील आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी उभे राहतील. *त्या प्रत्येकामध्ये तुला तुझा शुभम दिसेल.*
मित्रानो, खरं तर काळाने घाव घातला म्हणून नाही तर भविष्यात या देशावर वाईट नजर ठेवणाऱ्याच्या छातीत अजून गोळ्या उतरवायच्या होत्या आणि त्याच इर्षेने एवढ्या कमी वयात भारतीय सैन्यात आलो होतो. तुम्ही माझे बलिदान व्यर्थ घालवणार नाही याची खात्री आहे. *मीडिया ने गुन्हेगार असून सलमान ला किती दाखवले, 2 दिवस शहिद शुभम मुस्तापुरे ला दाखवण्यापेक्षा सलमानला मच्छर चावतात, झोप येत नाही, जेवला नाही असे दाखवून किती किळसवाणा प्रकार केला याचा विचार करू नका कारण त्यांचा धंदा TRP वर चालत होता.* पण मी तर तुमच्या मनामध्ये होतो ना..तुम्ही फक्त भारतीय सैन्यात अजून शुभम कसे सामील होतील याचा विचार करा आणि *”भविष्यात या मातीच्या जीवावर उठलेल्या दुश्मनांच्या छाताडावर गोळ्या घालण्याच्या माझ्या अर्धवट इच्छेला पूर्णविराम द्या…”*

आपल्या सर्वांचा,
*शहीद – शुभम मुस्तापुरे*

©लेखक/कवी- अभिषेक मोहोळ
(9922166508,8623802826)

*शहीद – शुभम मुस्तापुरे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.*
💐💐💐💐💐💐💐💐💐

*Plz share – आपल्या देशासाठी,आपल्या जवानांसाठी…*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta