शहीद व्हायच्या आधी फक्त 2 च दिवस शुभम त्याच्या आईसोबत जे बोलला होता ते वाचून तुमचं काळीज रडल्याशिवाय राहणार नाही…!

शहीद व्हायच्या आधी फक्त 2 च दिवस शुभम त्याच्या आईसोबत जे बोलला होता ते वाचून तुमचं काळीज रडल्याशिवाय राहणार नाही…!

‘आई मी दोन दिवसात येतोय….!’

अस फोनवर सांगितलं होतं पोरानं…. 2 दिवसात येतो म्हणणारे पोरगं आलं… पण ज्या अवस्थेत आल ती अवस्था बघून पाहणाऱ्याच्या काळजाचे तुकडे तुकडे होऊन गेले….!काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले भारतीय लष्करातील जवान शुभम मुस्तापुरे यांच्या निधनाने परभणीत शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वीच शुभम मुस्तापुरेंनी आई- वडिलांना घरी फोन केला होता. आपण दोन दिवसांत गावी येतोय, असे त्यांनी कळवले होते. मात्र, आता तिरंग्यात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव गावात आल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आहेत.

पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवर मंगळवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाक सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि उखळी तोफगोळ्यांचा मारा केला. यात मुस्तापुरेंसह एक अधिकारी व आणखी दोन जवान जखमी झाले. चारही जखमींना उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारांदरम्यान मुस्तापुरे यांचा मृत्यू झाला.

मुस्तापुरे हे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे सुपुत्र आहेत. अवघ्या २० व्या वर्षी मुस्तापुरेंना प्राण गमवावे लागल्याने गावात शोककळा पसरली आहे.

अवघ्या वीस वर्षाच्या पोरानं आपला जीव गमावला हे त्या माउलीला समजल्यावर काय अवस्था झाली असेल तिची…
गेले 2 दिवस सोशल मीडियावर एक कविता खूप वायरल होतेय… ती कविता वाचून प्रत्येकजण खरंच खूप भावनिक होतोय… तुम्ही ही कदाचित ही कविता वाचली असेल शुभम आपल्या आईला शेवटचं बोलतोय अशी आर्तता या कवितेत आहे. आणि हे वाचून अक्षरशः खूप रडू येतं… ही कविता पुन्हा एकदा वाचा…. या मातेच्या सुपुत्राला पुन्हा एकदा सलाम…!

#नक्की_वाचा
छातीवरती गोळी झेलली
अाई तुझी अाठवण अाली
माझी जगाचा निरोप घेण्याची
भेटीवाचुन जायची वेळ अाली

खूप वेदना झाल्या ग गोळि काढताना
ढसाढसा रडलो ग जखम बांधताना
सगळे असुनही अाज पोरकेपणाची वेळ अाली…

नंतर वाटले ग मी नशिबवान ठरलो…
भारतमातेसाठी लढताना शहिद झालो..
तिरंग्याच्या कफनातुनी,तोफेच्या सलामितुनी चाललो
कीती भाग्याची वेळ अाली….

अाज सारा गाव ग अाई मला पाहतो..
वीर जवान अमर रहे माझा जयघोष करतो…
तुझा लेक ग थोर जो तो तुला सांगतो..
अाई आहे ना ग मी गुणी
बाबाचाही हिरो बोल एकवेळी….

मातीच्या कणाशी,देशाच्या ईमानाशी माझे बंधन पाळले
शञूच्या वाराला मी प्रतिवार केले
संपले ग माझे अायुष्य ईथले
अमरत्वाचे मरण अाले
बेटा अशी दे ना ग अारोळी…

उद्या तुला दिसणार नाही
अाज डोळे भरुन बघून घे
ह्रदयातुन कधी जाणार नाही
हात गालावरून फिरवून घे
आई रडून घे ,मांडीवर झोपू दे
शांत झोपही अखेरच्या वेळी…

नक्की शेअर करा ही पोस्ट…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Archives

Categories

Meta